Blog

11

Aug

कोरोना नंतरची जीवनशैली

कोरोना महामारीने आपल्या सर्वांची जीवनशैली पूर्णपणे खराब केली आहे. अधिकाअधिक काळ आपण घरात बंदिस्त असतो. या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या शरीरावर हल्ला करतात. मुख्य म्हणजे अनियमित खाणं आणि योग्य दिनक्रम नसल्यामुळे आजारी पडण्याचा धोका अधिक वाढतो. हळूहळू आपल्या शरीरात असे काही बदल होत असतात, जे आपल्याला जाणवत असतात, पण आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही. सध्या अशीच एक समस्या अनेकांमध्ये दिसून येते ती म्हणजे हात आणि पाय सुन्न होणं. ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने कधी ना कधी हा अनुभव घेतलाच असेल. जर ही समस्या तुम्हाला सतत होत असेल तर तुम्हाला ती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मधुमेहामुळे सुमारे एक तृतीयांश लोकांच्या हात आणि पाय सुन्न होतात. म्हणूनच, जर तुमच्यासोबत हे वारंवार घडत असेल, तर तुम्ही एकदा डॉक्टरांकडून एकदा तपासणी करून घेणं उत्तम ठरेल. आम्ही रात्री बराच वेळ एकाच स्थितीत झोपल्याने तुमच्या पाय किंवा हात सुन्न होतात आणि त्यामुळे मुंग्याही येतात. सुन्न झालेल्या ठिकाणी थोडा वेळ मालिश केल्याने ही तक्रार जाणवत नाही. मात्र यानंतरही हात सुन्न राहिले तर काही गंभीर आजार होण्याची शक्यता असते. कित्येकदा हात आणि पायात रक्त प्रवाह योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे हात आणि पाय सुन्न होतात. अनेकदा, चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे, पाठीच्या कण्याभोवती असलेल्या मज्जातंतूंवर दबाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत सर्वायकलचा त्रास सुरू होतो. यामुळे हात आणि पाय सुन्न होतात. असं होत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. गळ्यातील थायरॉईड ग्रंथीमध्ये बिघाड झाल्यामुळे हात आणि पाय सुन्न होतात. यावेळी हाता पायांमध्ये मुंग्याही येण्याची तक्रार जाणवते. अशा परिस्थितीत, आपण डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. यावेळी मुख्य म्हणजे रक्त तपासणी करून घ्यावी. आजच्या घडीला अनेकजण कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात. यामुळे मनगटाच्या नसांवर परिणाम होतो. यामुळे कार्पल टनल सिंड्रोम होऊ शकतो आणि यामध्ये हात पाय सुन्न होण्याची शक्यता असते.
डॉ. उज्वला सुर्यवंशी

Read More

19

Aug

Standart Blog Post With Featured Image

There are many variations of passages of Lorem Ipsum available, but the majority have suffered alteration.

Read More

19

Aug

Standart Blog Post With Featured Image

There are many variations of passages of Lorem Ipsum available, but the majority have suffered alteration.

Read More

Recent Posts

libero tempore

At vero eos et accusamus et iusto ducimus

libero tempore

At vero eos et accusamus et iusto ducimus

© 2016 Donate. All Rights Reserved | Design by W3layouts